मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत ग्राम – केनवड येथे आज दिनांक 18.04.2024 रोजी सकाळी मा. पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे सर, यांचे आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी, श्री सुनील पुजारी सर वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुक संबंधाने प्रभावी एरिया डॉमिनेशन प्लॅन रूट मार्च ची कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर एरिया डॉमिनेशन प्लॅन अंतर्गत पथ संचलन व एरिया डॉमिनेशन दरम्यान सदर एरिया डॉमिनेशन करिता एकूण CISF चे 03 अधिकारी, 69 अंमलदार, KAP चे 03 अधिकारी, 55 अंमलदार, RCP चे 21 अंमलदार, QRT चे 06 जवान पो स्टे शिरपूर चे 03 अधिकारी, 12 अंमलदार, होमगार्ड सैनिक 03, एकूण 07 वाहने होते. एकुण – *09* अधिकारी आणि *166* अंमलदार हजर होते.