Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीनांदेड महानगर पालिकेच्या स्थानिक अभियंत्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या!...

नांदेड महानगर पालिकेच्या स्थानिक अभियंत्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या!…

महेंद्र गायकवाड
नांदेड

नांदेड वाघाळा महानगर झोन क्र. 1 मध्ये स्थानिक अभियंता या खाजगी नोकरीवर असलेले सिडको येथील रहिवाशी गोविंद पांचाळ यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे येथे आक्समिक मृत्यूची नोंद करण्यात आले असून आत्महतेचे करण अद्याप कळू शकले नाही .दरम्यान पांचाळ यांच्या आत्महत्ये संदर्भात तर्कवितर्क निघत आहेत.

सिडको एन. डी. 3 येथील रहिवाशी
गोविंद मनोहर पांचाळ वय 45 वर्ष हे नांदेड महानगर पालिका झोन क्र.1 तरोडा सांगवी बू.येथे स्थानिक अभियंता म्हणून कार्यरत होते.ते. 13 जानेवारी सकाळी 11.30 वा.घरून ड्युटी वर जातो म्हणून गेले. परंतु ते ड्युटी वर न जाता विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर स्मशान भूमीचे बाजूला गोदावरी नदीत स्वत पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.या प्रकरणी त्यांची पत्नीने दिलेल्या खबरीवरून ग्रामीण पोलीस ठाणे येथे आक्समिक मृत्यू चा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मेदे हे करित आहेत. दरम्यान ह्या आत्महतेचे कारण अद्याप कळू शकले नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: