Sunday, December 22, 2024
Homeराज्यटिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल ड्राइवर (मोटारमन)चा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू…

टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल ड्राइवर (मोटारमन)चा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू…

टिटवाळा – प्रफुल्ल शेवाळे

टिटवाळा स्थानकात आज सकाळी रेल्वे रूळ ओलांडताना मोटरमन ला मुंबई कडे भरगाव वेगाने जाणाऱ्या गोरखपूर मेल – एक्सप्रेस गाडीने धडक दिली, यात मोटरमन चा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. डी. के. नाग असं या मोटरमन चे नाव आहे..

टिटवाळा स्थानकामधील रिंगरूम मधून निघून मोटरमन नाग हे सकाळी 6:46 ची टिटवाळा मुंबई-(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -CSMT ) लोकल चा चार्जे घेण्यासाठी जात होते.. परंतु या वेळी रेल्वे रूळ ओलांडताना मुंबई दिशेने वेगाने जाणाऱ्या गोरखपूर या मेल गाडीने मोटरमन नाग यांना धडक दिली..

जी लोकल मुंबई ला घेऊन जायचं होतं त्याच लोकल ने मात्र मोटर मन डी. के. नाग यांचा मृत देह शव विच्छेदना साठी पुढे कल्याण ला रुग्णालयात नेण्यात आला आहे. सदर दुर्दैवी घटनेने रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे..

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: