रामटेक – राजू कापसे
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना डावलून त्याऐवजी उमरेडचे आमदार राजू पारवे यांना महायुती कडून लोकसभा रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे तुमाने यांच्या चढत्या राजकीय आलेखाला ब्रेक लागला होता.
मात्र महायुतीने दिलेला शब्द पाळत तुमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. या सर्व परिस्थितीत रामटेकचे आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांची तुमाने यांचा विधान परिषद निवडणुकीत उम्मदवारी दिल्याने मुख्यमंत्री यांचे आभार मानले, २५ वर्षानतर पहिल्यादा विदर्भाला विधान परिषदेत जागा मिळाल्या व २ पैकी २ ही जागा विदर्भ ला दिल्याने शिवसैनिक मध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
कृपाल तुमाने यांच्या विजयाबद्दल काल दि.१४ जुलै रोजी शिवसैनिकांकडून नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. तर मतदारसंघात ठिकठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करत शिवसैनिकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रामटेक मतदारसंघाला शिवसेनेचे दोन आमदार मिळाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची पत वाढली आहे.
नागपूर विमानतळावर आमदार तुमाने दाखल होताच शिवसैनिकांकडून फटाक्याची आतिषबाजी व मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, युवासेना विदर्भ संपर्क प्रमुख शुभम नवले,शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, मौदा तालुका प्रमुख प्रशांत भुरे, पारशिवणी उपतालुका प्रमुख प्रेम भोंडेकर, युवासेना जिल्हा प्रमुख राजेश गोमकाडे,
रामटेक पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, माजी जि.प.सभापती नंदा लोहबरे, जि.प.सदस्य नरेश धोपटे,नगर परिषद रामटेक माजी सभापती बिकेंद्र महाजन, पुरु मेश्राम, विश्वास पाटील, सुमित कोठारी,जितेंद्र वालोकर,राहुल गुंढरे,नितेश वांगे, राहुल ढगे, शिवसेना प्रसिध्दी प्रमुख हर्ष कनोजे, प्रणय धोपटे, रामपाल किरपान, मंगेश महाजन, सौरभ सिंगनजुडे, विलास तांदूळकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.