रामटेक – राजू कापसे
कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये 23 मार्च 2024 ला विद्यार्थ्यांच्या 19 विविध फोरम, असोसिएशनचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली. यावेळी विद्यार्थी डीन डॉ. पंकज आस्टनकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. यशवंत जीभकाटे, एकेडमिक डीन डॉ. विलास महात्मे, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी फोरमच्या माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट कार्य केले आहे. आवडीचा छंद कधीही सोडू नये. व्यावसायीक शिक्षण सोबत छंद जोपासल्याने विद्यार्थ्यांची प्रतिमा निखारते. ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,वेळेचे व्यवस्थापन करावे, नियमित वाचन करावे, दिनचर्येची रूपरेखा पाळावी.
डॉ. पंकज आस्टनकर यांनी प्रस्तावना मध्ये एकुण 19 विविध फोरम, असोसिएशन व युनिट विषयी सविस्तर माहिती दिली व म्हणाले की सयुक्तिक काम केल्याने मोठे यश मिळते. यात उत्कृष्ट कलेला वाव मिळतो. या वेळी विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र व स्मृति चिन्ह देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता डीन यांचेसोबत सर्व फोरम च्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन खुशी टक्कामोरे, विवेक एल्कापेल्ली, खुशी जीवतोडे, हरवंश कटरे यानी केले. आभार प्रदर्शन पासंग चूक्ला यांनी केले.