Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअकोल्यातील व्हाईट कोळसा बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग...Video

अकोल्यातील व्हाईट कोळसा बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग…Video

अकोला येथील एमआयडीसी फेज 4 मधील व्हाईट कोळसा बनवणाऱ्या कारखान्यात आग लागली. आज ही घटना कशी घडली याची चौकशी करण्यासाठी अग्निशमन अधिकारी दाखल झाले आहेत. ही आग इतकी भीषण आहे की हजारो क्विंटल कच्चा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आग अजूनही आटोक्यात आली नाही…

अशा परिस्थितीत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, कारण बाजूलाच दुसऱ्या प्लांटमध्ये गॅस गोदाम आहे. ही आग विझत नाही, ती आटोक्यात प्रयत्न अग्निशमन दल करत आहे. या आगीत हजारो क्विंटल माल जळून खाक झाला असून, त्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.या आगीमुळे एवढ्या मोठ्या कारखान्यात आग विझवण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: