Saturday, November 16, 2024
HomeMarathi News Todayज्या घराचा पाया मजबूत त्याच घराची इमारत चांगली...ज्ञानेश्वर कुहीकर...

ज्या घराचा पाया मजबूत त्याच घराची इमारत चांगली…ज्ञानेश्वर कुहीकर…

शारदा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंधरावी वार्षिक सभा…

राजु कापसे प्रतिनिधी

नागपूर : रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात कसे होते. हे समजण्यासाठी ज्या घराचा पाया मजबूत, त्या घराची इमारत चांगली होत असल्याचे गौरवोद्गार मौदा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच ज्ञानेश्वर कुहीकर यांनी व्यक्त केले.

शारदा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मौदाची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २४ सप्टेंबर रोजी येथील स्थानिक धनजोडे सभागृहात पार पडली, त्यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) देवेंद्र गोडबोले, जि.प. चे माजी सभापती व सदस्य तापेश्वर वैद्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराव सार्वे, संस्थाध्यक्ष रंजना धनजोडे, उपाध्यक्ष तिर्थमाला गजभिये, मोरेश्वर सोरते, चिंतामण पिंपळघरे, मिर्झा बेग, भाऊराव धनंजोडे, हेमराज सावरकर, दयाळनाथ नानवटकर उपस्थित होते.

जसे एखाद्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होते, त्याचप्रमाणें मौदा येथील शारदा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सुरुवात तशीच झाली. अनेक अडचणीवर मात करत संघटना समोर कशी वाढत गेली याचा लेखाजोखा आपल्या प्रस्ताविकातून संस्थेचे सर्वेसर्वा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वासनिक यांनी मांडली. दरम्यान अनेक पतसंस्था बुडाल्या असल्याचे सांगायला विसरले नाहीत. यावेळी देवेंद्र गोडबोले, तापेश्वर वैद्य, रंजना धनजोडे यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. तर संस्थेचा वार्षिक अहवाल (जमाखर्च) संस्थेचे व्यवस्थापक पायल वर्मा यांनी वाचून दाखविला.

पतं संकलन प्रतिनिधी व ठेवीदारांचा सत्कार

पतसंस्था चालविण्याकरिता महत्त्वाचे काम करणारे म्हणजेच पत संकलन प्रतिनिधी करत असतात त्यातील प्रथम क्रमांक पुरुषोत्तम ठोंबरे, द्वितीय क्रमांक ललिता बावणे व तृतीय क्रमांक कीर्तीलाल कावळे यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच इतर संकलन प्रतिनिधी व ठेविदारांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सदस्या उर्मिला समर्थ, शारदा नानवटकर, अंजली वासनिक, मनीषा रडके, रेखा वाढीवे, रूपाली हिवसे, निशा ठोसरे, किरण कन्नाके, रूपाली मस्के, उषा लुटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोरेश्वर सोरते यांनी तर आभारप्रदर्शन तिर्थमाला गजभिये यांनी मानले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: