Wednesday, July 17, 2024
spot_img
Homeराज्यआरटीओ विभागामार्फत काढण्यात आली भव्य रस्ता सुरक्षा संदेश देणारी Walkethon रॅली...

आरटीओ विभागामार्फत काढण्यात आली भव्य रस्ता सुरक्षा संदेश देणारी Walkethon रॅली…

माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री दुतोंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत दिनांक 13.2.2024 रोजी रस्ता सुरक्षा जनजागृती साठी वसंत देसाई स्टेडियम येथून प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत Walkethon चे आयोजन करण्यात आले होते, सदर वाक्यथॉन मध्ये बहुसंख्य नागरिक व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वॉकीथॉन वसंत देसाई स्टेडियम येथून माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले अग्रसेन चौक-दुर्गा चौक-सिविल लाइन रोड-पोस्ट ऑफिस चौक-बस स्थानक परिसरासमोरून-टॉवर चौक-व पुन्हा वसंत देसाई स्टेडियम येथे येऊन उपस्थित त्यांना माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्वलिखित रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देऊन समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत रस्ता सुरक्षा संदेश देणारे सेल्फी पॉईंट उभारण्यात आलेले होते सदर सेल्फी पॉईंट मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपले सेल्फी घेऊन रस्ता सुरक्षा जागृती बाबत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

सदर वाकेथोन मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला चे प्राध्यापक, विद्यार्थी स्काऊट गाईड भवनचे छात्र, व विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, त्याचप्रमाणे मैदानावर पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी वृंद इत्यादी विविध क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काढलेल्या रॅलीमध्ये विशेषतः ही रॅली वॉक ऑन राईट चा संदेश देत प्रथमच उजव्या बाजूने वॉकीथॉन ला सुरुवात झाली हे या रॅलीचे वैशिष्ट्य हो.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: