रामटेक – राजु कापसे
राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा आयोजित ओबीसी जनजागृती रथयात्रेचे भव्य स्वागत 2 फेब्रुवारीला बस स्टण्ड येथे सायंकाळी करण्यात आले. बस स्टण्ड वरुण पैदल ओबीसी जनजागृती यात्रा गांधी चौक येथे आली व गांधी चौक येथे सभा झाली.
यावेळी राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले की 31 जानेवारी 23 पासुन ओबीसी जनजागृतीला दिक्ष्या भूमि नागपुर येथून सुरुवात झाली आहे. यात्रा जिल्यातिल प्रत्येक तालुक्यात जाईल. तालुक्याच्या माध्यमातून प्रत्येक गांवोगावी व घरोघरी ओबीसीच्या हकाची जाणीव करून देण्यात येईल. ते म्हणाले की ओबीसी मधुन मराठा समाजाला आरक्षन देउ नये.
ओबिसीची जात गणना तुरंत करावी, केंद्रात ओबीसी मंत्रालय तुरंन्त सुरु करावे, आपल्या हक्कासाठी ओबीसीनी जागरूक राहावे, त्यानी ओबिसी समजाला जागरूक राहण्याचा सल्ला दिला व म्हणाले की रात्र वैऱ्याची आहे. ओबिसी आरक्षण मधे केव्हाही दगा फटका होउ शकतो. ओबिसी आरक्षण मधे असणाऱ्या सोयी सवलतिचा फायदा घेण्याचे आव्हान त्यानी ओबिसी समजाला केले.
सनदी अधिकारी किशोर गजभिये म्हणाले की भारत स्वतंत्र झाल्यावर ओबिसीचा प्रखर लढ्या नंतर माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यानी 43 वर्ष्या नंतर 1990 मधे ओबिसीला आरक्षण दिले. ओबिसी समाजानी ते टिकवून ठेवावे. मराठ्यांना ओबीसी मधे बॉक डोर आरक्षण दिले जात आहे.
या वेळी प्रामुख्याने राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये, ओबीसी राज्य महीला उपाध्यक्ष कांचनताई माकडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे, समन्वयक नानाभाऊ उराडे,
विदर्भ प्रांत संगठक रमेश कारामोरे, नमो नमो अध्यक्ष विजय हटवार, माजी नगराध्यक्ष दिलिप देशमुख, कृषी उत्पन्न बजार समिती सभापती लक्ष्मण उमाळे, भाऊराव राहाटे, सुधाकर मोहोड, तुलाराम मेंढे, श्रीराम वाघुलकर मंच वर उपस्थित होते.
तसेच राहुल किरपान, नरेंद्र काळे, करीम मालाधारी, आलोक मानकर, बालचंद खोड़े, किरण करमोरे, कामिनी हटवार, वीस्वनाथ कापसे, गोपी कोल्हेपरा, रमाकांत कुंभलकर, राहुल जोहरे, जगदीश सांगोड़े, कविश्वर खडसे , मनोहर भगत ,
ज्योति कोल्हेपरा, पल्लवी श्रीरामे, सुरेखा उराडे, लता कामडे, वंदना पाटिल, अल्का सेलोकर, ममता काळे, बबिता कोठेकर, वर्ष्या सावरकर, हर्षा कारामोरे, दर्शना गजभिये, सहित आदि उपस्थित होते। संचालन मोरेश्वर माकड़े व आभार राहुल किरपान यानी केले.