बिलोली – रत्नाकर जाधव
२०७ व्या भिमाकोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह विजय स्तंभाला अभिवादन कारण्यात येऊन शहरातून विजयस्तंभाची रॅली काढण्यात आली.
१ जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी या दिनाचा २०७ शौर्य दिन बिलोली शहरात साजरा करण्यात आला. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला व विजयस्तंभाला अभिवादन करून विजयस्तंभाच्या प्रतिकृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पासून मिरवणूक काढून गांधीचौका पर्यन्त मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी मिरवणुकीत महिला,पुरुष व बालकांची लक्षनीय उपस्थिती होती.मिरवणूकीची सांगता डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली.यावेळी येथील पोलीस निरीक्षक अतुल भोसले व सहाय्य्क पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता