अहेरी – मिलिंद खोंड
सर्व रामभक्तांचे लक्ष वेधलेल्या लागून राहिलेल्या २२ जानेवारी रोजीच्या अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने आल्लापल्ली नगरी राममय होणार आहे. यानिमित्ताने कलश यात्रा, महाआरती असे विविध कार्यक्रम होणार असून, रामानामाच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून जाणार आहे.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापणा होत असल्याने आल्लापल्ली तील रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा ऐतिहासिक सोहळा अविस्मरणीय व्हावा याकरिता भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आलापल्लीत श्रीराम मंदिर कमिटी तर्फे श्रीराम मंदिरात १७ जानेवारी पासून २०जानेवारी पर्यत सायंकाळी श्रीराम नाम जप यज्ञ, हनुमान चालीसा पठण, राम रक्षा पठण महाआरती ,गरबा चे आयोजन करण्यात आले आहे.२१जानेवारी सायंकाळी 4.00 वाजता सर्व मंदिरातून कलश यात्रा निधून ती श्रीराम मंदिरापर्यंत निघणार आहे.
22 जानेवारी ला सकाळी 9 ते 10:30 पर्यत अभिषेक व पूजा चे आयोजन करण्यात आले आहे. 11.00 ते 12.20 पर्यंत अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट एल.सी.डी स्क्रिनवर थेट प्रक्षेपण., 12.20 ते 12.45 अयोध्येतील आरतीचे थेट प्रक्षेपण त्यानंतर श्रीराम मंदिर आलापल्ली येथील मंदिरात महाआरती.
दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत स्थानिक भजन मंडळाचे भजन. सायंकाळी 6.00 वाजता सर्व भक्तांनी आपापले घरी दीप प्रज्वलन करून दोन दिवे श्रीराम मंदिरात दीप उत्सव करीता घेऊन येतील.
सायंकाळी 7.00 वाजता श्रीरामाची आरती करून व्यापारी संघटनेच्या वतीने महाप्रसादाला सुरुवात करण्यात येईल. कार्यक्रमात आल्लापल्ली येथील मोठ्या प्रमाणावर भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम मंदिर कमिटी द्वारे कळविण्यात आले आहे.