नरखेड – अतुल दंढारे
राम नवमी देशात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राम नवमी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. राम नवमी निमित्त गावात शोभा यात्रा काढण्यात आली.
सायंकाळी ६ वाजता लक्ष्मी माता मंदिर बाजार चौक येथून शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रा मध्ये ढोल ताशा, डीजे त्याच प्रमाणे शिवाजी महाराज, राम, लक्ष्मण, शिता व बजरंग बली यांची वेशभूषा साकारण्यात आली. विशेष म्हणजे क्रेन च्या साहाय्याने बजरंग बली यांची शोभा यात्रा क्रेनवर काढण्यात आली. बाजार चौक ते राम मंदिर पुनर्वसन पर्यंत ही शोभा यात्रा काढण्यात आली. गावात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले त्याच प्रमाणे शोभायात्रेवर सर्वत्र फुलांचा वर्षाव करण्यात आला.
सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले सर्व गावकरी या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. सर्वत्र जय श्री राम चे नारे दिले गेले त्यामुळे सर्वत्र राम मय वातावरण पाहायला मिळाले. शोभा यात्रा गावातील सर्व भागांतून काढण्यात आली असून या शोभा यात्रेची सांगता राम मंदिरात करण्यात आली. यावेळी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेत सर्व गावकरी मंडळी सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे या शोभा यात्रेकरिता पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.