वीरांगना राणी अवंतीबाई लोधी स्मृतिदिन…
लोधी सामाजिक संस्थेचे आयोजन…
नरखेड – अतुल दंढारे
लोधी समाजाचे प्रेरणास्थान शहीद वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या स्मृतिदिन निमित्त वीरांगना राणी अवंतीबाई लोधी सामाजिक संस्था, काटोल कडून शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. लोधी समाजाचे नेते सुभाष नोरोलिया यांच्या नेतृत्वात वीरांगना राणी अवंतीबाई लोधी ‘बलिदानदिन’ मुख्य कार्यक्रम पारडसिंगा येथे पार पडला.
काटोलमध्ये शोभायात्रा डोंगरगावच्या सुजल सिमेंट प्रोडक्ट्स येथून सकाळी सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गावरून कृषी उत्पन्न बाजार समितीवरून परतल्यानंतर खानगाव मार्गे श्रीक्षेत्र सती अनसूयामाता देवस्थान पारडसिंगा सभागृहात समारोप झाला.शोभायात्रेत जवळजवळ 1500 हजार समाजबांधव उपस्थित होते.राणी अवंतीबाई यांच्या वेशभूषेत असणाऱ्या ईशीता बंजारे,नंदिनी खरपुरीया,धनवी खरपुरीये शोभायात्रेच्या केंद्रबिंदू होत्या.
आयोजक सुभाष नोरोलिया यांनी राणी अवंतीबाई लोधी यांचा इतिहास सांगितला.तेव्हा ते म्हणाले,भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी अवंतीबाई लोधी या पहिल्या महिला शहीद वीरांगना होत्या. १८५७ च्या क्रांतीमध्ये रामगढच्या राणी अवंतीबाईंनी भारताच्या इतिहासात नवी क्रांती घडवून आणली.
श्रीक्षेत्र सती अनसूयामाता देवस्थान पारडसिंगाच्या प्रांगणात श्री सती अनुसया माता संस्थान,पारडसिंगा अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते राणी अवंतीबाई यांच्या पुर्णाकृती अश्वारूड पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी दिनेश ठाकरे, किशोर गाढवे, अशोक काळे, सुभाष नोरोलिया, राम खरपुरिया, शेषराव मुरोडिया, रतनलाल कुमेरिया,
अज्जूसिंग बासेवार, एकनाथ खजुरिया, निहाल कुमेरिया, शेखर खरपुरिया, छोटू खरपुरीया,अनिल नौकरिया,सुखदेव चौधरी,लिलाधर खरपुरीया, उमराव बेहनिया, उमेश मुरोडिया, राजू मुरोडिया, राजू फाले, अशोक जुगसेनिया,अरुण कुमेरिया,बाबाराव कुमेरिया,प्रमोद माहोरीया,विनोद खरपुरीया, धिरज जुगसेनिया रमेश गुजवार उपस्थित होते.