सांगली – ज्योती मोरे
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील स्मारकाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याबद्दल सभागृहातील सत्ताधारी आमदार सुधीर गाडगीळ यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे मातंग समाजातील जेष्ठ नागरिक सुधाकर आवळे, प्रकाश आवळे, संजय कांबळे यांच्या हस्ते या परिसरातील मातंग समाज बांधवांनी जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कारा वेळी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस यांच्या नेतृत्वा खालील भाजपा सेनेच्या सरकारने गेल्या नऊ महिन्यात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच अनेक योजना सुरू केले आहेत. त्याच बरोबर राज्य परिवहन बसेस मधून 75 वर्षावरील वृद्धांना मोफत प्रवास तर महिलांसाठी 50% सवलत सुरू केली.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध समाजाच्या घटकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून लवकरच या ठिकाणी भव्य स्मारक उभे राहील. तसेच सांगली शहरातील देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी भविष्यात निधी उपलब्ध करून दिला जाईल.
तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस अविनाश मोहिते यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समाजकार्याचा, लोकसाहित्याचा, त्यांच्या जीवनशैलीचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा उल्लेख करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
यावेळी भाजपा अनुसूचित मोर्चाचे शहराध्यक्ष, अमित भोसले, मातंग समाज चेतना परिषदेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू भोसले, सुजित राऊत, भाजपा अनुसूचित मोर्चाचे मंडलाध्यक्ष विकास आवळे, भाजपा व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष आनंदराव चिकोडे, सुरज माळी, राहुल माळी, राजू मगदूम, अक्षय कांबळे, राजू मद्रासी, संदीप आवळे, राजू सांगळे आदी मान्यवर व या परिसरातील नागरिक उपस्थित होते.