रामटेक – राजु कापसे
आज दिनांक 26 एप्रिल 2024 ला चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसर रामटेक येथे आदर्श सर्व धर्मीय विवाह सोहळा आज पार पडला रामधाम मनसर येथे श्री.चंद्रपाल चौकसे यांनी खूप मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज आयोजित केला होता. आजच्या या सोहळ्याला खूप मोठ्या प्रमाणात जनतेनी उपस्थित दाखवून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनमोहक असे आदिवासी नृत्य सादर केले.त्यानंतर लगेच पारंपरिक पद्धतीने नवरदेवांचे आगमन झाले आणि लगेच त्यानंतर नवरीचे पणआगमन झाले.अशाप्रकारे सुंदर असे आयोजन चंद्रपाल चौकसे यांनी विवाह सोहळ्याचे केले होते. कोणतेही काम अवघड नसते याची प्रचिती चंद्रपाल चौकसे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला दिली.
75 जोडप्यांनी आजच्या या सोहळ्याच्या माध्यमातून आपले लग्न पार पाडले.लोकांचे जास्त गर्दी होऊ नये म्हणून चंद्रपाल चौकसे यांनी एलईडीची पण सुविधा केलेली होती जेवणाची पण सुविधा चौकसे यांनी उत्तम रीतीने केलेली होती वर वधूंसाठी वेगळी सुविधा महिलांसाठी वेगळी सुविधा आणि पुरुषांसाठी वेगळी सुविधा केलेली होती.
आजच्या या कार्यक्रमाला सुनील भाऊ केदार, मुक्ताताई कोकडे , रश्मीताई बर्वे, ज्योतीताई कुमरे, दुर्गाताई सरियाम, कलाताई ठाकरे ,ईश्वरजी कुमरे, हेमंत जैन डॉक्टर इमरान अहमद ,हेमराज चौकांद्रे, कांचनताई धानोरे ,योगेश रंगारी, शोभाताई राऊत ,ऋषी भाऊ किंमतकर ,शंकर चामलाटे, वेदप्रकाश मोकादम, ,मीताराम सव्वा लाखे, अशी दिग्गज मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत घेता, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे………
विदा करंदीकर यांच्या या कवितेतल्या ओळीच्या माध्यमातून चंद्रपाल चौकसे यांच्या माणुसकीचे दर्शन झाले. मिळालेल्या मिळकतीतून दहा टक्के हिस्सा आईच्या सांगण्यानुसार मी गरजू लोकांवर खर्च करतो असे चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू लोकांना चंद्रपाल चौकसे यांची फार मदत होते .सर्व खर्च चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून करण्यात येतो.