Saturday, November 23, 2024
Homeराज्यपरमात्मा एक आनंदधाम येथे भव्य सामुहीक सोहळा संपन्न...

परमात्मा एक आनंदधाम येथे भव्य सामुहीक सोहळा संपन्न…

  • सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध
  • अनेक राजकियांची आवर्जुन हजेरी

रामटेक – राजू कापसे

परमात्मा एकचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त परमात्मा एक आनंदधाम रामटेक येथे बुधवारी ३ एप्रिल रोजी लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरावा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यात एकुण २१ जोडपी विवाहबद्ध झाली.

विवाह सोहळ्यापुर्वी सकाळच्या सुमारास २१ जोडप्यांची शहरातुन भव्य वरात निघाली होती. वरात एवढी भव्य होती की यादरम्यान रस्त्यावरील वाहतुक काही वेळाकरीता विस्कळीत झालेली होती. नवरीकडील मंडळी अगोदरच्या दिवशीच आनंदधाम ला येत असतात. या दिवशी लग्न कार्यातील जवळपास सर्वच कार्यक्रमे येथे पार पडत असतात.

या सर्व बाबींकडे लक्ष्मणराव मेहर ( बाबुजी ) जातीने लक्ष देत असतात. वराड्यांसाठी उत्तम असे जेवन तयार झाले पाहिजे त्याकडेही त्यांचे बारीक लक्ष असते. एकुणच हा भव्य कार्यक्रम योग्य व उत्तमरित्या कसा पार पडेल याकडे बाबुजींचे लक्ष वेधले असते. या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल, माजी मंत्री राजेंद्र मुळक,

माजी आमदार डि मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, नमो नमोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, रश्मि बर्वे माजी जि.पं. अध्यक्ष, शांता कुभंरे जि.पं. सदस्य, दुधराम सव्वालाखे जि.पं. सदस्य, नरेंद्र बंधाटे रामटेक पं.स. उपसभापती, शोभा झाडे माजी जि.पं. सदस्य, सृष्टीसौंदर्यचे ऋषीकेश किंमतकर, माजी नगरसेवक सुमित कोठारी,

ज्योती कोल्हेपरा, बिकेंद्र महाजन, राष्ट्रीय अध्यक्ष बजरंग मेहर, प्रभुनाथ कोयपरे, कचूरु म्हात्रे, नारायण नाकाडे, किशोर खंडोदे, अजय खेडगरकर, प्रीति मेहर, शारदा बर्वे, लक्ष्मी म्हात्रे, अर्चना वरखेडे,गीता खंडोदे, मतानी मॅडम आदी उपस्थित होते.

सातत्याने माझे प्रयत्न सुरूच – मेहर (बाबुजी)

राज्य शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांनी गावोगावी व्यसनमुक्ती, स्वछता व सामूहिक विवाहासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमादरम्यान केले.

लक्ष्मणराव मेहर यांचे व्यसनमुक्तीचे कार्य उत्कृष्ट असल्याची ग्वाही उपस्थित अनेक सेवक,सेविकांनी दिली. या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातुन हजारो कुटुंबांना तथा गरजूंना एकप्रकारे मोठी आर्थिक मदत मिळत असते हे तेवढेच खरे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: