Monday, December 23, 2024
Homeराज्यश्री सिदाजी महाराज व्यायम शाळा व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन...

श्री सिदाजी महाराज व्यायम शाळा व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

पातूर – निशांत गवई

२६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिन आणी हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती निमीत्त श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य मॅरेथॉन स्पेर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात गेल्या अनेक दशकापासून तरुण युवकांना योग्य मार्गदर्शन व शरीरिक दृष्ट्या प्रबळ बनवण्याचे कार्य श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री मंगेश गाडगे व मित्रपरिवार यांनी हाती घेतले आहे.

कार्यक्रमाचे उ्घाटक म्हणून मा. तहसीलदार दिपकजी बाजड, मा. ठाणेदार हरीश गवळी,प्रा.विजयसिंह गहिलोत हे उपस्तिथ होते.तसेच प्रमुख पाहूने म्हणून सर्व बालुभाऊ बगाडे (मा.सभापती) विठ्ठल सरप (जिल्हा प्रमुख) नितीन मानकर, महेश मोरे, प्रणव पाटील, सौरभ नगोशे उपस्तिथ होते.कार्यक्रमामध्ये माजी सैनिक तुकारामजी नीलखन यांचा तसेच
उपस्थित पत्रकाराचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये उमेश देशमुख, मोहन जोशी, निशांत गवई,किरण निमकडे, देवानंद गहीले, स्वप्नील सुरवाडे, राम वाढी , , गोपाल बदरखे.मो. फरहाण अमीन हे सर्व मान्यावर उपस्तिथ होते. शहरातील क्रीडापटू चा आणी श्री सिदाजी म.व्यायम शाळा मधील क्रीडापटूचा आणी युवाश्री विशाल राखोंडे यांचा भारत सरकार चा राष्ट्रीय युवा पुस्कार मिळाल्या बद्दल सुद्धा सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत शेकडो युवक सहभागी झाले होते.यात मुलांच्या गटात प्रमोद कुमार(नाशिक) याने प्रथम,आशिष थेटे(अमरावती)द्वितीय, रोहित कदम ( पुसद)याने तृतीय क्रमांक पटकवला तसेच मुलींच्या गटामध्ये श्वेता पावरा (धुळे) हिने प्रथम विशेष म्हणजे या मुलीचा पायामध्ये चप्पल किंवा बूट ही नव्हता तरी पहिला नंबर पटकवला तर अश्विनी जाधव (परभणी) द्वितीय तसेच प्रणाली शेगोकार( शेगाव) तृतीय क्रमांक पटकवला आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज परिहार,भैरव ठाकूर, पवन तायडे( शिवसेना शहर प्रमुख) सुरज क्षीरसागर, उमेश उंबरकार, दिपक वाघमारे, मंगेश गाडगे मित्रपरिवार पातूर यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: