आज हातुर्णा या गावांमध्ये नविन वर्षा निमित्त हेल्पिंग फाउंडेशन सामाजिक संस्थे मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, मानवी जीवनामध्ये मनुष्याला नविन जीवन देणे म्हणजे रक्तदान करणे तसेच रक्तांचा मोठा प्रमाणात तुटवता होतो त्या मूळे रुग्णांना रक्त मिळणे शक्य होत नाही रक्तदान करणे फार महत्त्वाचे आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान हेच बाब लक्षात घेता हेल्पिंग फाऊंडेशन संस्थे मार्फ़त व रक्त पेढी जिल्हा सामान्य रुग्णालय टीम अमरावती यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते , या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तालुका अध्यक्ष मा : मंगेश जी इंगोले पाटील व प्रमुख पाहुणे सरपंच भरतारीनात गौरकार, तसेच पोलिस पाटील मुक्तेश्वर घाटे तसेच,
संस्थे चे संस्थापक आनंद बागडे अक्षय जवंजाळ, कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन करून करण्यात आली सोबतच कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थे चे अध्यक्ष सुगत भोंगडे यांनी केले तसेच गावचे ग्रामस्थ राजू जोंधळे , नितेश रडके,भूषण वाणे, बालू भानगे, शुभम शिरसाट, प्रशांत अठोर, अमोल हिवराळे, गौरव स्वर्गे, भूषण भानंगे, व धीरज बोने, जुनैद मोमोन, अविनाश बोने, आकांशा टेंभरे, जानवी, प्रद्या मॅडम व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.