Sunday, November 17, 2024
Homeराज्यरामटेक येथे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे आगमण निमित्त भव्य बाईक...

रामटेक येथे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे आगमण निमित्त भव्य बाईक रॅली…

रामटेक – राजू कापसे

31 आॅगस्ट ला धम्म गुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या रामटेक आगमण निमित्त भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅली ची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मनसर बाजार चौक येथील डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुण रॅली मनसर येथील मंजुश्री बुद्ध विहार येथे पोहचल। तिथुन वाहिटोला,

शितलवाडी या मार्गाने रामटेक येथील डाॅ. आंबेडकर चौक येथे बौध्द उपासक- उपासिका द्वारे रॅली चे स्वागत करण्यात आले. तसेच रामटेक येथे ठिक-ठिकानी रॅली चे स्वागत करण्यात आले व त्यानंतर रॅली नागार्जुन बुद्ध विहार येथे पोहचली.तिथे बुध्द वंदना घेऊन भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे भव्य स्वागत करण्यात आले। उपासक- उपासीकांना भोजनदान करण्यात आले.

यावेळी ॲड.प्रफुल अंबादे,भीम पँथरचे अध्यक्ष मनोज बंसोड,अमित अंबादे, आनंद पाटील,सोनू चौहान,नीरज बांगरे, दीपक सहारे,राकेश साखरे,पूनम अंबादे,मनीष खोब्रागडे, समीर घरडे,नितीन कराडे,हिमांशू पानतावणे,अतुल धमगाये ,महेश साखरे, रमाई महिला संघ मनसर, बाबांचे लेकर, धम्मज्योती बुद्धविहार, मातोश्री रमाई बुद्ध विहार येथील समस्त उपासक- उपासीका तसेच हजारोंच्या संखेने अनुयायी उपस्थीत होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: