Sunday, November 17, 2024
Homeराज्यरेडीमेड कापड दुकानांचे शटर वाकवुन चोरी करणारी उत्तर प्रदेश येथील टोळी गजाआड...

रेडीमेड कापड दुकानांचे शटर वाकवुन चोरी करणारी उत्तर प्रदेश येथील टोळी गजाआड…

स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे कडून पो.स्टे. सिव्हील लाईन / रामदासपेठ हद्दीत रेडीमेड कापड दुकानांचे शटर वाकवुन चोरी करणारी उत्तर प्रदेश येथील टोळी गजाआड

अकोला – पोलीस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत दिनांक १६.०७.२४ रोजी रात्री दरम्यान नेकलेस रोड वरील तायबा कलेक्शन व जे.जे अॅनेक्स या कापड दुकानाचे शटर वाकवुन तसेच श्री. बालाजी अॅटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकान व जठारपेठ चौकातील वैशाली ड्रायफुट चे दुकान व आनंद झेरॉक्स सेंटर या दुकानाचे अज्ञात चोरटयांनी शटर वाकवुन दुकानातील मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेली होती. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, पोलिस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अज्ञात आरोपी विरूध्द ०३ चोरीचे गुन्हे नोंद करण्यात आले होते.

गुन्हा घडल्यावर विविध घटनास्थळावरून सि.सि.टी. व्ही फुटेज मध्ये संशयीत आरोपीचे चेहरे स्पष्ट होते. त्यांची ओळख पटवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान होते.सदरील फोटो राज्यात / ईतर राज्यात प्रसिध्द करून गोपनिय सोर्स व तांत्रिक विश्लेषनावर आरोपी चा सहभाग निष्पन झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने भुसावळ पर्यत पाठलाग केला होता. रात्री उशीरा स्था.गु.शा. अकोला यांना आरोपी हे

उत्तर प्रदेश असुन त्यांचे नावे १) मोहम्मद राशीद उर्फ गब्बरू मोहम्मद मुशाहीद, रा. शहाजमाल, किथोर ता. मवाना जि. मेरठ, (उत्तर प्रदेश) २) मोहम्मद सलमान मोहम्मद शोकीन रा. शाहाजमाल, ता. मवाना जि. मेरठ, (उत्तर प्रदेश), ३) मोहम्मद नदिम मोहम्मद बुदुखों रा. मसुरी ता.जि. गाजियाबाद ४) मोहम्मद नदिम मोहम्मद कल्लु रा. मसुरी ता.जि. गाजियाबाद (उत्तर प्रदेश) हे असल्याचे निष्पन्न झाले.सदर पथक भुसावळ वरून परत येत असतांना तेच आरोपी लातुर येथे असल्याची गोपनिय माहीती प्राप्त झाली. पथक लातुर येथे तात्काळ पोहचणे शक्य नसल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे प्रभारी अधीकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखा, लातुर यांचे सोबत संर्पक साधुन आरोपी कोठे थांबले आहेत या बाबत सर्व माहीती दिली होती.

लातुर येथे गुन्हा करण्या पुर्वीच स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखा, लातुर यांनी नमुद आरोपी यांना ताब्यात घेतले.अकोला पोलीसांना याबाबत माहीती मिळाल्याने सदर आरोपी हे भारतभर मुख्य शहरात मध्ये अशा प्रकारे गुन्हे करणार होते होणा-या गुन्हयाला प्रतिबंध बसुन आरोपी जेरबंद करण्यात आले.सदर आरोपीतांनी अकोला येथील तायबा कलेक्शन सह ईतर दुकानांचे शटर वाकवुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पो.उप.नि. आशिष शिंदे व ०८ अमंलदार यांनी सदर आरोपी लातुर न्यायालयाचे परवानगी ने अटक करून अकोला येथे पुढील कार्यवाही करीता घेवुन आले.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व पोउपनि. आशिष शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार, सुलतान पठान, वसिमोद्दीन, आकाश मानकर, लिलाधर खंडारे, अभिषेक पाठक, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर, सतिश पवार, विजय कबले तसेच सायबर सेल चे अंमलदार आशिष आमले यांनी सदर ची कारवाई पार पाडली

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: