Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingगुजरात निवडणुकीच्या निकालावर 'अंदाज अपना अपना'चा मजेदार व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल...पाहून...

गुजरात निवडणुकीच्या निकालावर ‘अंदाज अपना अपना’चा मजेदार व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल…पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही…

न्युज डेस्क – गुजरात निवडणुकीच्या निकालात ‘भारतीय जनता पार्टी’ ला प्रचंड बहुमत मिळाले, मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सोशल मिडीयावर मिम्सवर जोरदार पाऊस पडत आहे. जोतो आपापल्या कल्पनाशक्तीने मिम्स तयार करून सोशल मिडीयावर like आणि विव मिळवत आहे.

यामध्ये एक अतिशय मजेदार क्लिप देखील आहे, जी गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चे निकाल लोकांना अतिशय मजेदार पद्धतीने समजावून सांगत आहे. होय, ही क्लिप पाहून तुम्हाला कळेल की गुजरातमध्ये निकालच्या दिवशी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची (AAP) काय अवस्था झाली होती.

ही व्हिडिओ क्लिप 8 डिसेंबर रोजी @iPandeyShweta ट्विटर हँडलवर हसणाऱ्या इमोजीसह “गुजरात निवडणुकीचे निकाल समजून घ्या” या मथळ्यासह शेअर करण्यात आली होती. शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्लिप पाहिल्यानंतर अनेक वापरकर्ते त्यांच्या हास्यावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, तर काहींनी लिहिले की गुजरात निवडणुकीच्या निकालांचे हे सर्वोत्तम स्पष्टीकरण आहे.

यावर तुमचे काय मत आहे? टिप्पण्यांमध्ये लिहा. वास्तविक, ही क्लिप अभिनेता सलमान खान आणि आमिर खान यांच्या ‘अंदाज-अपना-अपना’ या प्रसिद्ध चित्रपटातील आहे, जी गुजरात निवडणुकीचे निकाल लक्षात घेऊन चेहरे एडीट करून तयार करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: