नांदेड – महेंद्र गायकवाड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, व नांदेड जिल्हा विविध एकविरा क्रीडा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने विविध खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण शिबीर 16 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत सर्व वयोगटातील विद्यार्थी खेळाडूंसाठी मोफत असणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभागी होणेसाठी 15 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत आपली नांवे चंद्रप्रकाश होनवडजकर (7972953141), बालाजी शिरसीकर (7517536227), श्रीमती शिवकांता देशमुख (9657092794) यांचेकडे नोंदणी करावेत व अधिक माहितीकरीता संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
यामध्ये विविध खेळातील बदलणारे तंत्रज्ञान, खेळाच्या नियमातील बदल, सद्यस्थीत खेळाचे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अद्यावत स्थितीबाबत नांदेड जिल्हयातील खेळाडूंना या कार्यालयामार्फत अद्यावत ज्ञान, प्रात्याक्षिक व इतर विविध पध्दतीने तज्ञ प्रशिक्षक, अनुभवी खेळाडू आणि विविध पदाधिकारी यांच्याद्वारे देण्यात येणार आहे.
हे शिबीर सन 2024-25 च्या स्पर्धेची पूर्वतयारी लक्षात घेऊन निश्चि करण्यात आलेला आहे. तसेच या शिबीरामध्ये शासनाचे क्रीडा मार्गदर्शक तसेच विविध खेळ संघटना, इतर अकॅडमीचे तज्ञ क्रीडा मार्गदर्शक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू व तज्ञ पदाधिकारी यांच्याद्वारा खेळनिहाय तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यामध्ये आर्चरी, टेनिक्कॉईट, मैदानी, जिग्रॅस्टिक्स, तलवारबाजी, सिकाई मार्शल आर्ट, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सींग, खो-खो, बुध्दीबळ, ज्युदो, सेपक टकरों, नेटबॉल, टेबल टेनिस, फुटबॉल, सॉफटबॉल, कराटे, कॅरम, रग्बी, तेंग-सु-डो, बेल्ट-रेसलींग, हॉकी, तायक्काँदो, हॅन्डबॉल, मल्लखांब, स्केटींग, बेसबॉल व इतर खेळाचा समावेश असुन नांदेड शहरातील व जिल्हयातील विविध ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.