Monday, December 23, 2024
Homeराज्यबारशी(दुधाळा) येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न...

बारशी(दुधाळा) येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न…

मौदा – राजू कापसे

दिनांक:- ०३ मे २०२४ रोजी बारशी(दुधाळा),ता.मौदा येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत
अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर बारशी(दुधाळा) येथे मा.सौ.कल्पनाताई दडमल यांच्या निवास्थानी आयोजित करण्यात आले होते.

महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण-१८४ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-४५, व चष्मे करिता-१३९ लाभार्थी यांनी लाभ घेतला.या कार्यक्रम प्रसंगी गौरव पनवेलकर – शिवसेना वैद्यकीय नागपूर जिल्हाप्रमुख,

कल्पनाताई दिलीप दडमल(मा.सरपंच),धर्मराज झलके, अभिषेक प्रभू दोडके, रवींद्र रामा दोडके, निखिल दोडके, किसन भिलकर, महेश हिवसे, सुरज झलके, शिवदास कडू, मधुकर हिवसे,राजू झलके, विठ्ठल ढोले, रामा दोडके,निखिल कडू,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: