प्रतिनिधी हेमंत जाधव
खामगांव:- तालुक्यातील किन्ही महादेव येथे त्रस्त शेतकऱ्यांकडून चार दिवसीय डफळे बजाव तसेच घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या अशा की शेतकऱ्यांना सन 2023 चा पिक विमा मिळाला पाहिजे तसेच 2023 साली सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोजक याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे तसेच सन 2024 हे वर्ष ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावे नियमित कर्जदारांना प्रोत्साहन पर अनुदान देण्यात यावे 2023 पिक विमा हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावी 2023 सोयाबीन येलो मोजक मदत 13600 रुपये हेक्टरी देण्यात यावी.
ढगफुटी 2024 मदत हेक्टरी 150000 देण्यात यावी. यावर्षी जुलै 2024 मध्ये झालेल्या ढगफुटीमुळे किन्ही महादेवच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे प्रशासन फक्त पंचनामे करते आणि नुकसान भरपाई च्या घोषणा करते परंतु कोणत्याही प्रकारची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.किन्ही महादेव हे जनुना मंडळातून बदलून वझर मंडळ करण्यात यावे. इत्यादी सर्व मागण्या शेतकऱ्यांकडून या चार दिवसीय आंदोलनामध्ये करण्यात येत आहेत तरी प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.