रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक येथे बांबू योग्य बांधकाम साहित्य या विषयावर पाच दिवसांची कार्यशाळा आर्किटेक्चर विभाग, किट्स, रामटेकच्या आर्ची असोसिएशनच्या सहकार्याने 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पर्यंत आयोजित केली आहे.
कार्यशाळा सत्राचे उद्घाटन तज्ज्ञ व मार्गदर्शक प्रा.अजय ठोमरे यानी केले. अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे होते. यावेळी संयोजक व आर्किटेक्चर विभाग प्रमुख कल्पना ठाकरे, प्राधापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रामुख्याने हे तज्ञ सत्र आर्किटेक्चर आणि सिव्हिल अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तज्ञांच्या व्यावहारिक ज्ञानच्या अनुभवाद्वारे योग्य बांधकाम साहित्य म्हणून बांबूचे ज्ञान वाढवण्यासाठी आयोजित केले आहे.
आर्किटेक्चर आणि सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील एकूण 29 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला. या कार्यशाळेत तज्ज्ञांची व्याख्याने आणि भारतात उपलब्ध असलेल्या बांबूच्या विविध जाती, त्याचे गुण आणि त्याचा वापर बांधकामात कसा करायचा यांचा समावेश असेल. टुरिस्ट ढाबा, नागार्जुन, खिंडसी रोड, रामटेक येथे निवडलेल्या जागेवर बांबूची रचना तयार केली जाईल. वैदेही कडू आणि हर्ष सहारे यांनी सूत्रसंचालन तर सहसंयोजक व सहाय्यक प्राध्यापक अंजली नारद यांनी आभार मानले.