पातुर – निशांत गवई
पातुर शहरातील मुख्य आठवडी बाजारात असलेली खालेखा नामक बिल्डिंग मंध्ये देशी दारू चे दुकान आहे व गेल्या अनेक वर्षांपासून या बिल्डिंग मधील पहिला माळा व दुसऱ्या माळ्यावरील खोल्यांमध्ये देशी दारू चे पॅकिंग पुस्टे यांची व खाली होणाऱ्या बोटल या जमा करून यांचा साठा बिल्डिंग मधील खोल्यांमध्ये ठेवण्यात आला होता लागलेल्या आगीमुळे ठेवलेल्या पुस्टे जळुन खाक झाले.
त्यामुळे आगीच्या तावडीत संपूर्ण बिल्डिंग आली व आगीच्या ज्वाला ह्य अत्यंत उष्ण गतीने जळत होत्या या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अकोला येथील अग्निशामक दलाच्या दोन तुकड्या पातुर येथील घटना स्थळी पोहचल्या व पातुर नगरपरिषद च्या अग्निशामक दलाच्या जवळपास दोन व ईतर वाहन यांनी मिळून जवळपास दोन ते तीन तास आग विझवून आटोक्यात आणली.
या वेळी पातुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गाडगे, दिगंबर बंड, गजानन वानखडे,मनोहर मते ,राम मते,, दुलेखा युसुफ खान, अग्निशामक वाहन चालक अश्फाक उल्ला खान, मुदंसिर, यांनी अथक प्रयत्न केले व या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, तर घटना स्थळी पातुर पोलीस स्टेशनचे, ए पी आय सोळुंके होमगार्ड जितेंद्र चव्हाण, वैभव गाडगे उपस्थित होते.