मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वाढत्या वाहन चोरीच्या घटनेवर अंकुश लावून भामटे गजाआड करण्याच्या दृष्टीने मूर्तिजापूर शहरात विविध वर्दळीच्या 3 ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांच्या पथकाने ४१ दुचाकी चालकांवर कारवाई करून २३५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
शहरात रस्त्यावरील शाळा महाविद्यालय परिसरात टवाळखोर व वेड्यावाकड्या दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढल्याचे व बाजाराच्या दिवशी दुचाकी व मोबाईल चोरी जात असल्याचे निदर्शनास आल्याने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी गुरुवारी व शुक्रवारी पोलीस पथकासह ४१ दुचाकी वाहनधारकांची तपासणी केली असता त्यात ट्रिपल सीट,
विना हेल्मेट ,फॅन्सी नंबर प्लेट ,विना लायसन व हॉर्न मध्ये मर्यादा न पाळणे याची तपासणी करून ४१ वाहनांवर मोटर वाहन कायद्याप्रमाणे केसेस करून तेवीस हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यातील ४ वाहन संशयित वाटल्याने जप्त करण्यात आले.
शुक्रवारला बाजारात सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या गाडीवरिल पिए सिस्टीम वरून चोरीबाबत जनजागृती अभियान राबविले सदरची कारवाई ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, वानखडे व १८ कर्मचारी यांनी केली.