Wednesday, January 8, 2025
Homeराज्यपातुरमध्ये पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ...

पातुरमध्ये पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ…

पातुर – निशांत गवई

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पातुर तालुक्यातील पातुर घाटाचे वर असलेल्या वनराई सभागृहामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून एक मोठा कार्यक्रम सहा जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर पत्रकार, प्रशासन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या प्रसंगी पातुर तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या वतीने महसूल नायब तहसीलदार बळीरामजी चव्हाण, पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, ज्येष्ठ पत्रकार राजाराम, रमेश देवकर, दिलीप भाऊ इंगळे, सुदेश इंगळे, श्रीधर लाड,

संजय गोतरकर, नारायणराव अंधारे, प्रा. करुणा गवई, श्रीमती भारती गाडगे, निशांत गवई मंचावर उपस्थित होते तसेच, पातुर तालुक्यातील विविध खेड्यापाड्यात पत्रकारिता करत असलेले कर्तबगार पत्रकारही सन्मानित करण्यात आले. या पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, निस्वार्थपणे लोकांना माहिती पोहोचवण्याचे कार्य केले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी मनोगत संवाद आणि गीतमंजुषा कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांना एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव अंभोरे आणि संतोष उपरवट यांनी केले. आभार प्रदर्शन मनोहर सोनोणे यांनी केले.

कार्यक्रमाला पातुर तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यामध्ये छगन कराळे, शेख नाजीमभाई, छगन बोदडे, सय्यद हसन बाबू, रमेश नीलखन, गोपाल सातव,

रुपेश इंगळे, राजू मुके, अविनाश पोहरे, जुबेर शेख, भावेश गिरोलकर, तौकीर अहमद, राजेश अवचार, जनार्दन हिरळकर, राजेश देशमुख, प्रेम कुमार शर्मा, गणेश लहामगे, अनंत अंधारे, आशिष शेगोकार, सय्यद हसन बाबू, लावण्य अतकर यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाने पातुर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील महत्वाच्या योगदानाची ओळख करून दिली आणि पत्रकारांना प्रोत्साहन मिळाले…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: