Monday, December 23, 2024
Homeराज्यनालवाडा येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या...

नालवाडा येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या…

दर्यापूर – आदेश खांडेकर

दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत नालवाडा येथे काल दिनांक, ३ ऑगस्ट 2023 रोजी, नालवाडा येथील शेतकरी पुत्र नामे अरविंद लक्ष्मणराव नितोने यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली. सदर मृतक ही व्यक्ती ग्राम नालवाडा येथील भाऊरावजी तुळशीरामजी खांडेकर यांचे भाचे आहेत.

अरविंदq नितोने यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगी एक मुलगा व आई वडील असा त्यांचा राहत परिवार आहे. काही दिवसांपूर्वी मृतक अरविंद नीतोने यांच्या वडिलांना पॅरलेस आजाराने घेरले होते. तसेच त्यांची आई सुद्धा आजारी होत्या.त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर काही दिवस हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती. एकावर एक संकट आल्यामुळे त्यांचे शेतीवरही लक्ष लागले नाही.

शेतीमध्ये नापिकी झाल्यामुळे, आजारांसाठी व शेतीसाठी झालेल्या खर्चामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. त्यावर मुलांचे शिक्षणाचा खर्च उचलनेही त्यांना कठीण झाले होते. या सर्व बाबींना कंटाळून अखेर त्या शेतकरी पुत्राने आत्महत्येचा पवित्रा उचलला. व या निसर्गाचा अंतिम संदेश घेतला.

मुदत अरविंद नितोने यांचा स्वभाव प्रेमळ व निर्मळ होता.या घटनेची माहिती पोलीस स्टेशन खल्लारला मिळताच. सदर घटनेचा पंचनामा करून, उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आले. त्यानंतर आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी मृतक अरविंद नेते यांना अनंनतात विलीन करण्यात आले.

अरविंद लक्ष्मणराव नितोणे यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण ग्रामस्थ दुःख व्यक्त करत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: