कोल्हापूर – राजेंद्र ढाले
आज दिनांक 19/12/2022रोजी बेळगाव, कारवार, निपाणी बिदरभालकी सह संयुक्त महाराष्ट्र एक व्हावा यासाठी साठ वर्षांपासून लढा चालू आहे तरी महाराष्ट्र एकीकरण समितिने आज कागल रेस्ट हाऊस येथे आज महाराष्ट्र एकीकरणासाठी शिष्टमंडळाने कोगनोळी टोल नाक्यावरील मोर्चा नंतर आर.पी.आय (आठवले) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची भेट घेत चर्चा केली.
तेंव्हा आपण या संदर्भात सामाजिक न्याय केंद्रीय मंञी आठवले साहेब यांच्या शी या विषयी बोलून राज्य सभेत हा महाराष्ट्र एकीकरणाचा प्रश्न आवर्जून मांडावयास भाग पाडू तसेच सिमवासियांचा पाठीशी मोठा भाऊ म्हणून रिपब्लिकन पक्ष पाठीशी उभा राहील आशी खाञी उत्तम कांबळे यांनी या शिष्टमंडळास दिली.तेंव्हा या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरणाच्या घोषणाही देण्यात आल्या.