नांदेड – महेंद्र गायकवाड
येणाऱ्या दोन महिन्यात विविध धर्मियांचे महत्वपूर्ण असे चार उत्सव आहेत. या चारही उत्सवादरम्यान शहरातील नागरिकांना मुलभुत सेवासुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी काँग्रेसच्या तीन आजी-माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच याकाळात मनपाच्या वतिने मुलभुत सेवा सुविधा पुरविण्यात याव्यात अशी सुचना मनपा आयुक्ताकडे केली आहे.
येणाऱ्या काळात मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिना सुरु होणार आहे. या सोबतच हिंदु धर्मियांचा गुढी पाडवा व रामनवमी हा सण आहे. तर पुढील महिन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थात भीमजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आ. अमरनाथ राजुरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसच्या एका शिष्टमंडळानी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या सोबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत डी.पी. सावंत, अमरनाथ राजुरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी रमजानच्या महिन्यात एक दिवसाआड सकाळच्या सत्रात वेळेवर पाणी पुरवठा करावा. मज्सिद परिसरात नवीन एल.एल.डी. लाईट बसवावेत. जेथे पाणी पुरवठा होत नाही त्याठिकाणई टँकद्वारे पाणी पुरवठा करावा. ईफ्तारच्या नंतर दररोज गल्ली-बोळात साफ-सफाई करावी. रामनवमीच्या दिवशी रेणुकामाता मंदिर ते अशोकनगर येथील राममंदिरापर्यंत मिरवणुक निघते. त्या संपूर्ण रस्त्याची साफ-सफाई करावी.
दोन्ही मंदिरा समोर पीण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. दोन्ही मंदिर परिसरात लाईट दुरुस्ती करुन नवीन एल.ई.डी. बसवावेत. अशा सुचना या तिन्हीही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
गुढी-पाडव्याच्या दिवशी पाणीपुरवठासह शहरातील लाईट दुरुस्ती नवीन लाईट बसविणे. व प्रत्येक प्रभागाच्या साफ-सफाईकडे लक्ष द्यावे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भीम जयंती आहे. यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी करावी.
हा संपुर्ण परिसर साफ करावा व स्वच्छता ठेवावी. भीम जयंतीच्या दिवशी नांदेड शहर व जिल्ह्यातुन लाखो भीम भक्त येत असतात या सर्वांना पिण्याच्या पाण्याची टँकद्वारे व्यवस्था करावी. शहरातील प्रत्येक बुद्ध विहारा जवळ साफ-सफाई करुन लाईट दुरुस्त करावी. 14 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात शहराला पाणी पुरवठा करावा, आदी सुचना या काँग्रेस नेत्यांनी मनपा आयुक्तांना केल्या. या सर्व सुचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी यावेळी दिली.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक स्थाई समितीचे माजी सभापती किशोर स्वामी व माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार यांनी केले. यावेळी माजी महापौर अब्दुल सत्तार, जयश्री पावडे, माजी महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, माजी उपमहापौर मसुद अहमद खांन, आनंद चव्हाण, माजी सभापती शमीम अब्दुल्ला, विरेंद्रसिघ गाडीवाले, अमितसिंह तेहरा, माजी नगरसेवक सुभाष रायबोले, बालाजी जाधव, संदीप सोनकांबळे, मुन्तजीब, सुरेश हटकर, वाजीद जागिरदार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार, शहर अभियंत रफातुल्ला व कार्यकारी अभियंता आरसुळे व सर्व क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.