Monday, December 23, 2024
Homeकृषीकर्जबाजारी शेतकरी ५१२ किलो कांदा विकण्यासाठी बाजारात गेला...अन हातात आले फक्त २...

कर्जबाजारी शेतकरी ५१२ किलो कांदा विकण्यासाठी बाजारात गेला…अन हातात आले फक्त २ रुपये…

काही महिन्यांपूर्वी एक काळ असा होता की कांद्याचे भाव ऐकून लोक हैराण व्हायचे. एवढेच नाही तर सर्वसामान्यांनी कांदे खरेदी करून घरी आणणे बंद केले होते. सध्या कांद्याचे भाव यावेळी कमालीचे खाली आले आहेत.

कांद्याची घसरण एवढी झाली आहे की, शेतकरी स्वतालाच शिव्याशाप करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड नाराज आहेत. सोलापुरात एक शेतकरी भावाच्या विळख्यात सापडला आहे. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर रात्रंदिवस पिकवल्या जाणाऱ्या ५१२ किलो कांद्याला अवघा ५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बोरगाव (जडी) येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी आपल्या २ एकर शेतात हजारो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली आणि त्याबदल्यात अवघे दोन रुपये मिळाले तेव्हा ते कमालीचे नैराश्यग्रस्त झाले. अखेर काय झाले असेल.

17 फेब्रुवारी 2023 रोजी कांद्याला कमी भावामुळे मिळालेल्या पैशातून कर्ज फेडण्याच्या उद्देशाने राजेंद्र चव्हाण यांनी सोलापूरच्या सूर्या ट्रेडर्सकडे दहा गोणी कांदे नेले. कांद्याच्या 10 पोत्यांचे वजन 512 किलो होते, मात्र कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्याला 1 रुपये किलो भाव मिळाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: