3 लाख 77 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
सांगली – ज्योती मोरे.
बुधगाव मधील संदीप निकम वय वर्षे 31,सृष्टी बंगला, नम्रता कॉलनी, बुधगाव.तालुका-मिरज, जिल्हा- सांगली. हा इसम आपल्या गाडीत पिस्तूल आणि चाकू घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती खास बातमीदाराने दिल्यानुसार आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकने सदर गाडीचा पाठलाग करत सदर गाडीस बुधगाव औट पोस्ट समोर पकडण्यात येऊन, सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेवर 1 पिस्तूल मिळून आले, तर त्याच्या पॅन्टच्या खिशात 1 जिवंत काढतोस तर गाडीच्या ड्रायव्हर मध्ये 1 चाकू मिळून आला आहे.
या हत्यारान संदर्भात विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता,त्यांने याचा परवाना नसल्याचे सांगितले. या संदर्भात त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास 24 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या दरम्यान त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांने घरी 1 तलवार, आणखी 1 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे असल्याचं सांगितल्यानुसार, सदर हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहे.
त्याच्याकडून 25 हजाराचे 1 तर 50 हजारांचे 1 अशी 2 देशी बनवटीची पिस्तुले, 1 हजारांची 5 काडतूसे,2 हजार 200 रुपयांचा चाकू, 1 हजारांची तलवार आणि 3 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कंपनीची आय ट्वेन्टी कार असा एकूण 3 लाख 77 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, महात्मा गांधी पोलीस ठाणे, जळगाव पोलीस ठाणे या ठिकाणी मारामारी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार हे करतात. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहेब ,पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार ,पोलीस उपनिरीक्षक किरण मगदूम, मेघराज रुपनर,चेतन महाजन, हेमंत कुमार उमासे, अरुण अवताडे, सचिन धोत्रे, सुनील लोखंडे, कुबेर खोत, संदीप नलवडे, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुनील जाधव,प्रशांत माळी, स्नेहल शिंदे, सुनिता शेजाळे, प्रकाश पाटील, सचिन काकडे,आदींनी केले.