Thursday, January 9, 2025
Homeराज्यपोलीस स्टेशन खदान अकोला येथे एक देशी बनावटी चे पिस्टल व एक...

पोलीस स्टेशन खदान अकोला येथे एक देशी बनावटी चे पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगणारा अटकेत…

अकोला – संतोषकुमार गवई

पोलीस स्टेशन खदान अकोला येथे दिनांक २६/०५/२०२४ रोजी गुप्त बातमी व्दार मार्फत खात्रीलायक माहीती मिळाली की, एक इसम हा अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला येथे अवैदयरित्या एक देशी बनावटी चे पिस्टल जवळ बाळगुन संशयीत रित्या फिरत आहे अश्या बातमी वरून सदर ची माहीती मा. पो. नि. गजानन धंदर सा. यांना देवुन त्याचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी हे बातमी चे ठिकाणी रवाना होवुन अष्टविनायक कॉलनी खडकी येथे आम रोड वर संशयीत रित्या एक इसम हा फिरतांना दिसला त्सास आवाज देवुन थांबवुन स्टॉफ चे मदतीने घेराव घालुन त्याचे कंबरेला एक लोखंडी पिस्टल दिसुन आली ती पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतली सदर पिस्टल वी पाहणी केली.

आत्ताच व्हाट्सअप वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट, आपल्या परिसरातील घडामोडी व महत्त्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा. 

असता त्याला एक मॅकझीन व त्या मध्ये एक जिवंत काडतुस असा एकुण ३६,०००/-रू चा माल मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव संतोष पुडंलिकराव पाटील वय ३६ वर्षे रा अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला असे सागीतले त्सास पिस्टल बाळगण्या बाबत परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सागीतले त्सास पिस्टल बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडविचे उत्तरे दिली व समाधान कारक उत्तरे दिली नाही वरून त्यास पोलीस स्टेशन ला आणुन त्याचे विरूध्द अप क ४६०/२०२४ कलम ३,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सदर ची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतिष कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखीलो पो.नि.गजानन धंदर पोलीस स्टेशन खदान अकोला व गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदार पोहवा विजय चव्हाण, संजय वानखडे, नितीन मगर, विवेक सोनटक्के, शेख नासिर पोकों रोहीत पवार गणेश डुकरे यांनी केली

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: