पिंटू ढबाले, पांढरी
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात येत असलेल्या खरडगाव गावात परवानगी घेवून विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाला अचानक आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने खांबावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. पंकज दुर्योधन करडे वय 25 असे तरुणाचे नाव असून आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चि.पंकज दुर्योधन करडे वय 25 वर्ष मुक्काम पोस्ट खरडगाव, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ MSEB कंत्राटी ऑपरेटर म्हणून काम करीत होता. आज दिनांक 13/10/2023 रोजी खरडगाव येथील लाईनचे काम करताना मृत्यू झाला. पंकज हा एकुलता एक मुलगा असून गावात व आजूबाजूच्या परिसरातील अतिशय लाडका होता. सकाळी अधिकृत शिरसगाव उपकेंद्रावर परमिट घेऊन काम करीत असताना शिरजगाव उपकेंद्रावर लाईन चालू केली असताना त्याचा विद्युत पोलवर हलगर्जीपणा झाला असल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
तर गावातील काही नागरिकांनी यात एखाद्या कर्मचाऱ्यांचा हात असू शकतो का? असे गावकऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणी सदरील युवकाच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहे.