अकोल्यातील रिपब्लिकन ऑफ पार्टी इंडिया (आठवले) गटाचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर रामदास पेठ पोलिस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोल्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल होताच आरोपी गजानन कांबळे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवाशी असलेल्या 32 वर्षीय पीडित महिलेने रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तक्रारीत आपल्याला गेल्या 4 ते 5 वर्षेपासूनच लग्नाचे आमिष दाखवून अकोल्यातील रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांनी विविध पर्यटनस्थळी फिरविले व आपल्या मर्जी विरुद्ध आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
आपण आरोपीस लग्नाबद्दल विचारणा केली असता सदर आरोपी गजानन कांबळे याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करीत असल्याचे देखील तक्रारीत म्हंटले आहे. मागील काही दिवसांपूर्वी हॉटेल आर एस मध्ये एक खोली घेऊन सतत 4 दिवस पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहेत.
याबाबत रामदास पेठ पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेने फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी आरोपी गजानन कांबळे विरोधात कलम 376,2N (1) बलात्काराच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल केले आहेत. सदर प्रकरणा नंतर आरोपी गजानन कांबळे हा फरार झालं असून रामदास पेठ पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.