Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीरामटेकमध्ये तरुणीची ऑनलाइन फसवणूक गुन्हा दाखल, दीड लाखांची परस्पर उचल...

रामटेकमध्ये तरुणीची ऑनलाइन फसवणूक गुन्हा दाखल, दीड लाखांची परस्पर उचल…

रामटेक – राजु कापसे

अज्ञात आरोपीने बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलतो, अशी बतावणी करीत एका तरुणीची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना नुकतीच शहरात घडली. आरोपीने तरुणीच्या बँक खात्यातून १ लाख ४९ हजार ३५८ रुपयांची परस्पर उचल केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान अज्ञात आरोपीने फिर्यादी माया दिनेश वानखेडे (३८, रा. राजाजी वॉर्ड, रामटेक) यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, एसबीआय बँकेतून कस्टमर केअरमधून बोलतो, अशी बतावणी करीत तिला क्रेडिट कार्डचे ड्यू भरण्यास सांगितले. त्यासाठी आरोपीने तिला एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून क्रेडिट कार्ड व युनियन बँक खात्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर आरोपीने

एका कम्युनिकेशन साधनाच्या साहाय्याने तरुणीच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ४९ हजार ३५८ रुपयांची परस्पर उचल केली. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच माया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

अजुनही नागरीक अनभिज्ञच, एक शोकांतिका

बँक शाखांमध्ये ” बँक तुम्हाला तुमच्या खाते डिटेल्सबाबद कधीही फोन करून विचारत नाही ” या आशयाचा फलक बँक शाखांमध्ये लागलेला असतो, तरीसुद्धा नागरीक त्याकडे पाहुनही न पहाल्यासारखे करतात व शाखेबाहेर निघल्यावर विसरून जातात. तसेच whatsapp, वृत्तपत्रामधुनही ऑनलाईन फसवणुकीबाबदचे मॅसेज, बातम्या व्हायरल होत असतात तरीही नागरीक या प्रकारापासुन अनभिज्ञच असल्याचे दिसुन येत असल्याने याला येथे एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: