वर्धा येथील आरोपीस अटक…
मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव ता 6 – वारंगी येथील अल्पवयीन आदिवासी मुलीला फूस लावून पळवून नेण्यावरून वर्धा येथिल आसिफ रोशन खान पठाण (वय 36 वर्षे ) यांच्यावर पोस्को कायद्याच्या नुसार व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीने मालेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की ती मजुरीच्या कामासाठी वर्धा येथे गेली होती तेव्हा वर्धा येथे जात असताना रेल्वेच्या डब्या मध्ये तिच्या जवळ आसिफ खां रोशन खां आला.
त्याने त्याचा मोबाईल क्रमांक या मुलीला कागदावर लिहून दिला आणि कॉल करण्यास सांगितले नंतर या मुलीने त्याला फोन केला त्याने तुला मी न्यायला येतो तुला माझ्या सोबत यावे लागले असे सांगितले त्या मुलीचा पता व नाव विचारले आज ता 6 मार्च रोजी सकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान त्याने तिला फोन केला व तिला रिधोरा फाट्यावर ऑटो आणला आहे.
त्यामध्ये ये असे सांगितले त्या ऑटो ने त्याने तिला अकोला येथे रेल्वे स्टेशन वर नेले ऑटो मध्ये तिचा विनयभंग केला या मुलीच्या घरच्यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली तसेच या मुलीच्या आईला पहिल्या नंतर तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर घराच्याना जीवे मारण्याची धमकी दिली घरच्यांना धमक्या दिल्या लग्न करण्यासाठी जबरदस्तीने धाक दाखवून पळवून नेण्याचा आरोपावरून आसिफ रोशन खान पठाण यांच्यावर भादवी कलम 363 ,366,354 ,354(अ)504 ,506 ,507 ,सह कलम 8,12 पोस्को 2012सह कलम अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलम 3(1)(w)(i)(ii),3(1)(va) नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी करीत आहेत.