ग्राहकावर मागील तीन महीन्याचे वीजबिल थकीत
निंदणीय कृत्याचे महावितरणकडून निषेध
अमरावती – वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारवाईचा राग धरत पहूर (नांदगाव खंडेश्वर)येथील ग्राहक हरिदार मारब्दे यांचा मुलगा प्रविण मारब्दे यांनी थेट महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पद्माकर पाटील यांना धक्काबुक्की करत मारहान करून खाली पाडले आणि वीज पुरवठा जोडून नाही दिला तर जीवाने मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी मारहान करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने प्रविण हरिदास मारब्दे यांच्यावर भा. दं. वि. कलम 353, 332, 504 व 506 अन्वये नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
पहुर येथील हरिदार किसनराव मारब्दे हे महावितरणचे ग्राहक असुन 364141188897 हा त्यांचा ग्राहक क्रमांक आहे. ग्राहकांची वीजबिल भरण्याची कायम अनियमितता राहली आहे.सदर ग्राहकांकडे मे महीन्यापासुनचे एकून 4100 रूपयाचे वीजबिल थकीत आहे.
वारंवार आवाहन करूनही वीजबिल भरण्यास ग्राहकांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने आज दिनांक २६ ऑगष्ट रोजी दुपारी २ वाजल्याच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पद्माकर पाटील यांच्या उपस्थितीत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
यावेळी ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याचे सोडून वीज पुरवठा खंडित केल्याचा राग धरत चक्क उपकार्यकारी अभियंतांनाच मारहान केली.महावितरण प्रशासनाकडून या निंदनीय घटनेचा निषेध करण्यात आले असुन प्रविण मारब्दे यांच्यावर कठोर कारवाईसाठी महावितरण प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.
ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या बिलाचे वेळेत आणि नियमित भरणा करणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे.परंतू तसे होत नसल्याने वीजबिल वसुलीसाठी महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या घरापर्यंत जावे लागते. तरीही ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. उलट मारहान,शिवीगाळ अश्या निंदणीय घटनेला महावितरणला सामोरे जावे लागते.परंतू यापुढे वीज ग्राहकांना वेळेत आणि नियमित आपले वीज बिल भरावेच लागेल अन्यथा प्रत्येक महीन्याला त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
शनिवार व रविवार सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे;
जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाची अपेक्षीत वसूली न झाल्याने महावितरणकडून थकीक वीजबिल वसुली मोहीमेला अधिक गती देण्यात आली आहे.या मोहीमेत थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.तरी ग्राहकांना सुट्टीच्या काळात वीजबिल भरता यावे यासाठी महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहे.
या व्यतीरिक्त ग्राहक आपले चालू अथवा थकीत वीजबिल महावितरण मोबाईल एप,महावितरण संकेतस्थळ वापरून ऑनलाईन पध्दतीने भरू शकतात. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेत भरून महावतरणची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.