नांदेड – महेंद्र गायकवाड
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे अर्धापूर तालुक्यातील मौ. कोंडा येथे गेले असता मराठा समाजातील कांही जणांनानी त्यांची गाडी अडवून कर्तव्यवार असलेल्या पोलिसांशी धकाबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी वीस ते पंचवीस जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे लोकसभा निवडणुक अनुषंगाने अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथून खाजगी बैठक घेवुन परत निघाले असतांना त्यांची गाडी मौजे कोंढा येथील हनुमान मंदीराचे समोर चौकात आली असताना यातील एकुण 25 ते 30 आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन एकत्रीत येवुन खासदार अशोकराव चव्हाण यांचे गाडीचा रस्ता आडवीला असता तेथील कर्तव्यावरील पोलीस अधीकारी पोनि चंद्रशेखर कदम, सपोनि मस्के व पोलीस अंमलदार सपोउपनि वरणे, पोहेकॉ चव्हाण, देशमुख, पोकॉ लहानकर यांनी गाडी सुरक्षीतरीत्या काढुन दिली.
म्हणुन यातील आरोपीतांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देवुन तुम्ही आम्हांला खासदार साहेबांना भेटुन बोलु का दिले नाही, असे म्हणुन तुमची पाहुन घेतो असे कर्तव्यावरील पोलीसांशी धक्का बुक्की करून वाद करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
वगैरे वरून फिर्यादी नामे पोहेकॉ / 2313 भिमराव हिरामण राठोड, ने पोस्टे अर्धापुर यांनी दिलेल्या फिर्याद वरून सदर आरोपीतां विरूध्द पोस्टे अर्धापुर गुरन 162/2024 कलम 143, 147, 149, 341, 353, 323, 189 व सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेंडमेट कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.