Wednesday, January 8, 2025
Homeगुन्हेगारीनायगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास ५० हजाराची खंडणी मागणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल...

नायगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास ५० हजाराची खंडणी मागणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नायगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका इसमा विरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.मो. साजीद इरफान पिता मो. युसूफ खान रा. उमरकॉलनी, नांदेड हे नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी डॉ. मो. साजीद इरफान हे घरासमोरील रोडवर उभे टाकले होते. शेख अनिस शेख रहिम उर्फ अनिस बिल्डर सुपारीवाले हा त्या ठिकाणी आला.

त्याने डॉ. मो. साजीद इरफान यांना शिवीगाळ करुन ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास डॉ. साजीद यांचा हाफ मर्डर करतो अशी धमकी दिली. या प्रकरणी डॉ. मो. साजीद इरफान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात कलम ३८५, ५०४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार बेग हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: