Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड करून विनयभंग पातुर पोलिसात चार जणांविरुद्ध पोस्को सह गुन्हा...

अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड करून विनयभंग पातुर पोलिसात चार जणांविरुद्ध पोस्को सह गुन्हा दाखल..! आरोपी फरार…

पातुर – निशांत गवई

पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरातील एका विद्यालयातील इयत्ता नववी मधील पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून आरोपी महेश बाळू सौंदळे आणि त्याचे तीन मित्र सदर विद्यार्थिनीची छेडछाड करून त्रास देत होते तर दिनांक 19/9/2022 ला सहा वाजताच्या दरम्यान सदर अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करीत असताना आरोपी महेश बाळू सौंदळे यांने तिचा हात धरला तसेच त्याचे तीन मित्र यांनी सुद्धा तिला महेश सोबत जाण्याचा दम भरला तर आरोपी महेश याने मुलीचा हात धरून तिच्या कमी कपड्यातील फोटो दाखवत आणि अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला.

तर तिच्या वर्गामध्ये जाऊन शिक्षकांसोबत वाद घालून शाळेतील खुर्च्या आणि घड्याळ फोडले तसेच तिच्या लहान भावाला सुद्धा मारहाण केली अशी तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने पातुर पोलिसात दिल्यावरून पातुर पोलिसांनी महेश बाळू सौंदळे तथा त्याची तीन मित्र यांचे विरुद्ध कलम 354 354 ड 341 323 427 506 34 सहा कलम 8 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेनंतर आरोपी पसार झाले असून अद्याप पर्यंत आरोपीस पोलिसांना अटक करता आली नाही. सदर घटनेमुळे शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या असुरक्षे बाबत पालकांमध्ये भीती व्यक्त होत होत आहे .अकोला पातुर रोड लागत असलेल्या या परिसरात चिडीमारी करणाऱ्या युवकांची टोळके सतत फिरत असतात तसेच मुलींची छेडछाड करतात सदर प्रकारावर आळा घालण्यासाठी कॉलेज महाविद्यालयाने लक्ष देऊन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: