अमोल साबळे
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू वर्षी सुरवाती पासुनच अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली आहे, अश्यातच जिल्हाभरात शेतकरीवर्गामधून आंदोलने व निवेदने ई. च्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे, मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून नियम निकष न लावता सर्सगट सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच इतर मागण्यांसाठी 20 ऑक्टोबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या गळफास मोर्चातील शेतकरी पुत्र गोपाल पोहरे, सचिन जामोदे, अमोल माळी, मानाजी मेटांगे, विश्वास मेटांगे व इ.शेतकऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हे दाखल झाले आहेत.
याच आंदोलनाची दखल घेऊन 25% अग्रीम राशी नुकसान भरपाई देण्याचा आदेश अकोला जिल्हाधिकारी यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिला होता, मात्र एकीकडे जिल्हाभरात विमा कंपनीच्या व्यवहारात अनियमितता दिसून आल्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड कंपनीला अकोला जिल्हाधिकारी यांनी काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला आहे हे विशेष.