Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsकॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृती बद्दल मोठी उपडेट...

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृती बद्दल मोठी उपडेट…

चंद्रपूर : कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 27 मी रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अश्यातच त्यांची तब्येत बिघडल्याने कालच त्यांना दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसेच धानोरकर हे उपचाराला प्रतिसाद देत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन धानोरकर यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी ते नागपुरात खासगी इस्पितळात दाखल झाले होते. शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत झाल्यावर त्यांना एअर ॲम्बुलन्सद्वारे दिल्लीत हलविण्यात आले. त्यांच्या आतड्यांवर सूज असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. खासदार धानोरकर उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांची पत्नी आणि वरोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह दोन्ही मुले देखील दिल्लीत आहेत. खासदार धानोरकर यांचे निकटवर्तीय दिल्लीत दाखल झाले आहेत.

धानोरकर वेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असले तरी ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आलं आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: