Thursday, January 9, 2025
Homeगुन्हेगारीपुण्यात मोठा अपघात...भरधाव टँकरने ४५ वाहनांना उडविले...

पुण्यात मोठा अपघात…भरधाव टँकरने ४५ वाहनांना उडविले…

पुण्यातील नवले पूल परिसरात रविवारी मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. एका मोठ्या अपघातात एका टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने किमान ४५ वाहने आदळली. रविवारी रात्री बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाचं नियंत्रण सुटले. टँकरच्या धडकेने ४५ वाहनांचे नुकसान झाले असून अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिक पोलीस आणि पुणे शहर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8.30 च्या सुमारास नवले पूल परिसरात ही घटना घडली. तातडीने व्हॅन आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या.

पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी सुजित पाटील म्हणाले, “ब्रेक फेल झाल्याने टँकरने किमान ४५ वाहनांना धडक दिली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे.” काही जखमींना नुकसान झालेल्या वाहनांतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. अग्निशमन दलाचे बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: