अमरावती – केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रमाची काठीण्य पातळी एकसारखी झाली आहे. महापुरुषांनी दिलेली संस्कृती आणि शास्त्रज्ञांनी दिलेले विज्ञान याचा सुरेख संगम म्हणजे स्पर्धा परीक्षा होय.
विद्यार्थ्यांनी रील लाइफ सोडून रियल लाईफ मध्ये हाती पेन पुस्तक घेऊन अभ्यास केल्यास यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का निश्चितच वाढेल असा विश्वास चाणक्य फाउंडेशनचे संचालक व स्पर्धा परीक्षा तज्ञ मिलिंद लाहे यांनी केली.
अमरावती येथील अभियंता भावना आयोजित स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात श्री लाहे बोलत होते.
चाणक्य फाउंडेशन च्या वतीने आतापर्यंत स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग एक व दोन मध्ये अधिकारी पद प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे पोलीस कमिशनर नवीनचंद्र रेड्डी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसेवेतून पोलीस उपाधीक्षक झालेले केदार बारबोले यांच्यासह अनेक नवोदित अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना मिलिंद नाही म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये मोठा फेरबदल झाला आहे.
चंद्रकांत दळवी यांच्या समितीने अनेक सकारात्मक बदल सुचवल्यानंतर आता 2025 नंतर विद्यार्थ्यांना एकाच वेळी एक लाख पदांकरिता तयारी करता येणार आहे आता विद्यार्थ्यांवर मोठी जबाबदारी आलेली आहे 2025 ची बॅच ही पायोनियर बॅच ठरणार आहे.
अमरावती जिल्हा हा संतांचा जिल्हा आहे भाऊसाहेब देशमुख संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या मार्गावर चालत यशाचे शिखर सर करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी मनी बाळगावी. सध्याच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना फक्त युट्युब आणि समाज माध्यमांवरून अभ्यास करणे उपयुक्त ठरणार नाही त्या ऐवजी थिंकिंग प्रोसेस वाढवून एखाद्या विषयावर चिंतन करून आपलं मत व्यक्त करण्याची क्षमता ज्या विद्यार्थ्यांमध्ये तयार होईल.
ज्याप्रमाणे संत गाडगे महाराजांनी हाती झाडू घेऊन रस्ता साफ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी हाती पेन घेऊन अभ्यासात येणाऱ्या अडचणी क्लिअर करावा असं आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी केलं.