Monday, December 23, 2024
Homeराज्यसांगलीमध्ये पिता-पुत्राने घडवली ३५ किलो वजनाची सोन पितळेची सुंदर पालखी एरंडोलीतील जान्हवी...

सांगलीमध्ये पिता-पुत्राने घडवली ३५ किलो वजनाची सोन पितळेची सुंदर पालखी एरंडोलीतील जान्हवी देवीच्या नगर प्रदक्षिणेसाठी सजविला साज…

सांगली – ज्योती मोरे.

जिल्हा सांगली ( शहर ) येथे स्थानिक रहिवासी असणारे दिलीप आणि चेतन ओतारी या पिता पुत्रांनी सुंदर अशी सोनपितळेची 35 किलो वजनाची पालखी घडवली आहे.एरंडोली चे ग्रामदैवत जान्हवी देवीसाठी लाकडी पालखी वापरात होती.

एकाने सोन पितळी पालखीचा नवस बोलला त्यासाठी सव्वा लाख रुपये देऊ केले त्यातून पालखी साकारली तिला सिंहाचे पाय बसविले आहेत वरील बाजूस भोवरे कडे आहेत दोन बाजूंना ओम स्वस्तिक आधी धार्मिक चिन्ह कोरले आहेत पालखीवर वेलगुट्टी कोरली आहे काही काम ओतीव तर उर्वरित काम हस्त कारागीतून केले आहे पत्र्याला लवचिकता येण्यासाठी चांदी मिश्रीत असून धार्मिकतेच्या अंगाने सोन्याचाही अंश समाविष्ट केला आहे .

या सूंदर अशा सोनपितळी पालखीतून देवीची नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे, यात्रा व दसऱ्या दरम्यान समस्त गावभर पालखीतून देवीचा संचार चालतो पालखी दोघांना वाहून नेता येईल याकरिता कमीत कमी वजन असावे याकडे विशेष लक्ष दिले.

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून देवीचा गाभाराही सजविला आहे सोनू पितळेची प्रभावळ, चौकटीवर जय विजय बसवले आहेत.जिल्हा सांगली तालुका मिरज एरंडोली येथील जान्हवी देवीची यंदाच्या यात्रेतील नगर प्रदक्षिणा आणखी दिमागदार होणार आहे समस्त गावकऱ्यानी मिळून या जान्हवी देवीच्या नगर प्रदक्षिणेसाठी 35 किलो वजनाची सोनपितळी पालखी बनवून घेतली आहे सोन्याचांदीचा अंश समाविष्ट असलेली पालखी नुकतीच एरंडोलीला रवाना करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: