Sunday, December 22, 2024
Homeराज्य६१ वर्षीय व्यक्तीची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या...

६१ वर्षीय व्यक्तीची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या…

रामटेक – राजू कापसे

कोराडी येथील एका ६१ वर्षीय व्यक्तीने मानसिक त्रासाला कंटाळून खिंडसी तलाव येथे उडी घेऊन आत्महत्या केली. मृतकाचे नाव कमलनारायण गजानन खंडेलवाल रा. कोराडी असे आहे.

घरगुती कारणाने मानसिक तणावात असल्याचे रामटेक पोलिसांनी सांगितले. ते शनिवार दिनांक १६ सप्टेंबर सकाळी घरून निघून गेल्याचे कळते, परिवारासह कोराडी पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस केला असता तो रामटेक परिसरात ट्रेस झाला. त्याला रामटेक परिसरात शोधण्यात आले.

यादरम्यान खिंडसी तलावात एक प्रेत तरंगत असल्याची सूचना रामटेक पोलिसांना सायंकाळी मिळाली यावरून त्याचे परिवार व कोराडी पोलीस खिंडसी परिसरात पोहोचले. मृतदेह काढून कमलनारायण याचे मृतदेह असल्याचं स्पष्ट झाले. शव विच्छेदन करून मृतदेह परिवारांच्या हवाले करण्यात आला. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: