Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारी३३ वर्षीय युवा शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या...

३३ वर्षीय युवा शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या…

मूर्तिजापूर तालुक्यातील आदर्श ग्राम मधापुरी येथील एका ३३ वर्षीय युवा शेतकरी पुत्राने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार आदर्श ग्राम मधापुरी येथील धीरज बाळकृष्ण इंगळे वय ३३ वर्ष या युवा शेतकरी पुत्राने आपल्या वडिलाकडे असलेली शेती सांभाळत असे अशातच व्यवहाराची ,शेतीच्या कामाची धुरा ही सर्व धीरज कडे असल्याने आपल्या वडीलाकडे असलेला कर्जाचा डोंगर याची धास्ती घेऊन सततची नापिकी,

बँकेच्या कर्जामुळे आणि इतर सावकारी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे समजले शेती पिकत नसल्याने पुढे उदरनिर्वाह कशा प्रकारे करावा आणि कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत नेहमी सुन्न असणाऱ्या धीरज याने दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास विष प्राशन केल्याने त्याच्या आईने आरडाओरड केली याची माहिती गावातील लोकांना मिळाली असता लोकांनी धावपळ करून त्याला उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूम येथे घेऊन गेले.

असता परिस्थिती अत्यवस्थ असल्याने अमरावती येथील इरवीन हॉस्पिटलला पाठविण्यात आले तेथे उपचार सुरू असताना धीरजची प्राणज्योत मावळली त्याच्या पश्चात दोन लहान मुले आई वडील असा आप्त परिवार असुन गेल्या दोन तिन वर्षापुर्वी धिरजच्या पत्नीचे क्षयरोगाने निधन झाले होते. या दोन्ही पती-पत्नी यांच्या निधनाने दोन चिमुकली मुलगा- मुलगी पोरकी झाली असुन भविष्याचा मोठा डोंगर उभा राहिला सदर घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: