न्यूज डेस्क – अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणा फाटा जवळ एका 30 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शेख शाहरुख उर्फ फारुख असे मृतकाचे नाव असून तो शहराच्या सोनटक्के प्लॉट मधील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. जुने शहर पोलिसांनी या प्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
अकोला शहराच्या जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणा फाटा येथे आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास दगडाने ठेचून एका 30 वर्षीय युवकाची हत्या केल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली माहिती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता तेथे रक्ताच्या थारोळ्यात एक युवक मृतावस्थेत पडलेला होता.
जुने शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी ही बाब आपल्या वरिष्ठाना कळविली असता अकोला जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके ठेसे तज्ञ हे देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले होते.
घटनेचा अधिक तपास केला असता सदर मृतक हा 30 वर्षीय शेख शाहरुख उर्फ फारुख राहणार सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी असून आपल्याच परिचित व्यक्ती सोबत वाद होऊन हे हत्याकांड घडले असल्याची बाब सूत्रांकडून प्राप्त होत आहे. घटनेचे गांभीर्य पाहता जुने शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी त्वरित आपल्या कर्मचाऱ्यांसह सूत्र हलवण्यास सुरवात केली असता एका संशयीत आरोपीस या घटने प्रकरणी अटक केली आहे. नेमकी हत्या का व कोणत्या कारणावरून झाली याचा तपास सुरु असून तपासा अंतीच काय ते या हत्येमागील रहस्य उलघडेल.